Pune Deccan Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Deccan Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक करणाऱ्या तरुणाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत पुण्यातील भांडारकर रोडवरील लॉज व भोसरी येथील लॉजमध्ये घडला आहे. (Pune Rape Case)

याबाबत अहमदनगर येथे राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.26) डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम बाबाजी रोहकले (वय-23 मुळ रा. भाळवणी ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्यावर आयपीसी 376 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्याद ऐकमेकांच्या ओळखीचे असून एकाच जिल्ह्यातील आहेत.

आरोपीने पीडित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून पुणे आणि भोसरी
येथील हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका