Pune : डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे 135 रक्त पिशव्यांचे संकलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने रानडे बालक मंदिरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १३५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

संचालिका अ‍ॅड राजश्री ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती. उन्हाळा आणि कोरोनाच्या भीतीने शहरात काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. पुरेसा रक्तसाठा उपलब्ध व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीतून हा उपक‘म केल्याची माहिती श्री. आठवले यांनी दिली. डीईएसच्या विविध घटक संस्थांनी विशेषतः रमणबाग प्रशालेने विशेष सहभाग घेतला. दिनानाथ मंगेशकर रूग्णालय रक्तपेढी आणि सितारामदास रेड प्लस रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले.