युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणी आणखी दोघांचा शोध सुरू, आतापर्यंत 7 अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात राजकीय वादातून शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे पदाधिकारी दीपक विजय मारटकर (वय ३२) यांच्या खुनाप्रकरणी आणखी चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. बुधवार मध्यरात्री पेठेतील विजयानंद चित्रपटगृह परिसरात तीक्ष्ण हत्याराने खून केला होता.

प्रशांत उर्फ सनी कोलते (वय 25), राहुल श्रीनिवास रागीर (वय 22), रोहित कमलाकर कांबळे (वय 22, घोरपडी पेठ), रोहित दत्तात्रय क्षीरसागर (वय 21, गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. यापूर्वी तिघांना अटक केली होती. तर आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी मारटकर यांचे मेहुणे राहुल भगवान आलमखाने (वय ४३,रा. गवळी आळी, विजयानंद चित्रपटगृहाजवळ, बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास मारटकर जेवण करून गवळी आळी परिसरात थांबले होते. त्यावेळी दबा धरून बसलेले हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वारकरत खून केला होता. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी चौघांची माहिती मिळाली. त्यानुसार या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर उद्या यापूर्वी अटक केलेल्या तिघांची पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. त्यांना देखील पकडण्यात येणार आहे. दरम्यान आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे. त्यांना देखील लवकरच पकडण्यात येईल असे सांगण्यात आले.

महापालिका निवडणुकीत विजय मारटकर यांनी बुधवार पेठ भागातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी अश्विनी कांबळे हिने सुद्धा बहुजन समाज पार्टीकडून या भागातून निवडणुक लढविली होती. त्यावेळी कांबळे व मारटकर यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, आरोपी महेंद्र सराफ याच्या बरोबर मारटकर यांचा वाद झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी दीपक मारटकर यांना आरोपींनी धमकावले होते. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.