पुणे : अनैसर्गिक संभोगाची मागणी करणाऱ्या जेष्ठाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वरंवार अनैसर्गिक संभोगाची मागणी करणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. ही घटना रविवारी (दि.१६) रात्री साठेआठच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करेगावच्या जंगलात घडली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने करुन बारा तासाच्या आत दोघांना अटक केली.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B00W870EFO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a55fecdb-ba7f-11e8-a2c9-21db0574c2c3′]

बापु रामा केसकर (वय-४८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुभम बाळासाहेब आंबेकर (रा.उरुळी कांचन)  आणि मयूर संतोष माने (रा.उरुळी कांचन) यांना अटक केली आहे.

काल (रविवारी) कोरेगाव बाळू गावच्या हद्दीत बापु केसकर याचा अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणाकरीता गळा कापून खुन केल्याची घटना घडली होती. त्याबाबत लोणी काळभोर ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असताना पोलिसांनी मयत केसकर याची माहिती काढली. तसेच आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.

चौकशी दरम्यान आरोपींकडून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मयत बापू रामा केसकर यास लैंगिक दुर्बलता होती. तो आरोपी मयूर माने यास वारंवार फोन करून बोलाऊन घेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग करण्याची मागणी करायचा. त्यास आरोपी नकार द्यायचा परंतु  मयत हा आरोपीला काहीतरी काम देतो म्हणून जवळ बोलाऊन भेट घेऊन सारखं-सारखे अनैसर्गिक संभोगाची मागणी करत असे. त्याच्या या वागण्याला आरोपी वैतागला होता. या गोष्टीचा राग मनात धरून मयूर माने याने मयतास संभोग करण्यास येतो असा बहाणा करून त्याला कोरेगाव मुळ येथील फॉरेस्ट मध्ये घेऊन गेला. माने याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने केसकर याच्या नाकावर मारहाण करुन, धारदार चाकुने केसकरचा गळा कापून खून केला. तसेच मयत केसकरचा मोबाईल काढून घेतला असल्याची कबुली दिली. आरोपी मयूर माने याने गुन्ह्यात काढून घेतलेला केसकरचा मोबाईल तसेच गुन्ह्यात वापलेला चाकू हा शुभम आंबेकर याच्याकडे दिल्याचे सांगितले आहे.
[amazon_link asins=’B07D9G1GHB,B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aa414fca-ba7f-11e8-8cfd-87332d983961′]

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली असून दोन्ही आरोपींना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश मुंडे, पोलीस नाईक विजय कांचन, पोलीस नाईक सचिन गायकवाड, राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांच्या पथकाने केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.