पुणे : भाडेकरूच्या घरात घुसून डोक्याला पिस्तूल लावत खंडणीची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीच्या व्यवहारातील पैसे मिळाल्याची माहिती मिळाताच भाडेकरूंच्या घरात घुसून डोक्याला पिस्तूल लावत खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजार केले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. शुक्रवारी सकाळी कल्याणीगर परिसरात ही घटना घडली आहे.

आसिफ नसिम खान (वय.50,रा.एम.जी. रोड कॅम्प), इम्रान शफिक शेख (वय.32), सफराज इस्माईल शेख (वय.36, राहणार दोघेही कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कल्याणीनगर येथील एका 46 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. ते आरोपी आसिफ खान याच्या घरी भाड्याने राहतात. त्यांच्यात पैशांवरून वाद होते. दरम्यान फिर्यादींना जमिनीच्या व्यवहारातून पैसे मिळाले होते. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आरोपी फिर्यादींच्या घरात घुसले. त्यांना पैसे व कागदार सही करण्यास धमकावले.

फिर्यादीने नकार दिल्याने आसिफ खान याने त्याच्या जवळील पिस्तूल त्यांच्या डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी व त्यांच्या वडिलांना हाताने मारहाण केली. त्यामध्ये फिर्यादींच्या वडिलांना टी- पॉयवर ढकलल्यामुळे जखम झाली. यावेळी फिर्यादींच्या पत्नीच्या बोटाला देखली जखम झाली आहे. त्यांच्या डोक्याला पिस्टलचा दस्ता मारून जखमी करून पळ काढला होता.

Visit : Policenama.com