Pune : पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे झोन-4 चा पदाभार, गुन्हे शाखेतील ACP-1 आणि ACP-2 च्या नियुक्त्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांची शासनाने बिहार सार्वत्रिक निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना बिहार येथे हजर होण्यासाठी येथून कार्यमुक्त करण्यात आले आहे. परिमंडळ चारचा पदभार नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेचा विस्तार केल्यानंतर आज गुन्हे शाखेत दोन सहाय्यक आयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याचे आदेश दिले आहेत.

गुन्हे शाखेच्या एकपदी सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांची नियुक्ती केली आहे. तर गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त दोनपदी लक्ष्मण बोराटे यांची निवड करण्यात आली आहे. दोघांनी तात्काळ पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात करावी, असेही आदेशात म्हंटले आहे.