अन् पुण्याच्या उपमहापौर प्रसार माध्यमांवर भडकल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सोबत उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना देखील कोरोना संसर्गाची लागण झाल्याची चर्चा शहरात सकाळपासून सुरु होती. मात्र, ही सर्व चर्चा चुकीची असल्याचं उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केलं आहे. तसेच त्या सध्या सुखरुप आहेत.

सरस्वती शेंडगे म्हणाल्या की, नागरिकांनी घाबरुन न जाता सुरक्षित रहावे. तसेच चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर देखील त्यांनी आपला राग व्यक्त केला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना देखील कोरोना संसर्गाची लागण झाल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. तर महापौर यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं असून, त्यांचे स्वॅब तपासणीकरता घेण्यात येत आहेत. दरम्यान, उपमहापौर शेंडगे यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली नाही. त्यासंदर्भातील खुलासा त्यांनी स्वतः केला आहे.