Pune Development Project | विविध प्रकल्पांसाठी पुण्यातील आठ हजार एकर जागा राखीव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र (Central Government) आणि राज्य सरकारकडून (State Government) पुण्यात विविध प्रकल्प राबविण्यात (Pune Development Project) येत आहेत. या प्रकल्पांसाठी तब्बल आठ हजार 141 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी दोन हजार एकर जागा संपादित (Land Acquisition) करण्यात आली असून संबंधित जागा मालकांना 2 हजार 635.08 कोटी रुपयांचे वाटप (Pune Development Project) करण्यात आले आहे.

 

ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg (राष्ट्रीय महामार्ग क्र.965) पुणे जिल्ह्यातील 21 गावांमधील 136.25 हेक्टर जागा आवश्यक असून त्यापैकी 102.05 हेक्टर भूसंपादन झाले आहे. मोबदल्यापोटी 471.89 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी (Tukaram Maharaj Palkhi Marg) 39 गावांतील 324.78 हेक्टर जागा निश्चित केली असून 289.03 हे. जागेचे संपादन पूर्ण झाले आहे. मोबदल्यापोटी 777.74 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. (Pune Development Project)

 

चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी (Chandni Chowk Flyover) 18.56 हे. जागा आवश्यक होती. 100 टक्के भूसंपादन पूर्ण करण्यात आले असून संबंधितांना 81.48 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. पीएमआरडीए मेट्रोसाठी (PMRDA Metro) साधारण 12 हे. जागेपैकी 7.19 हे. जागा ताब्यात घेतली असून 57.98 कोटी रुपयांचे संबंधितांना वाटप करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

प्रकल्प                   गावे     आवश्यक जमीन   संपादित जमीन    मोबदला (कोटींमध्ये)

पुणे-नाशिक हायवे       ५२     २९७.४३                २८१.५९               ८४४.९१
पुणे-मिरज रेल्वे          १४      १८.०२ हे.                 १६.०५ हे.            ४४.३०
बारामती-लोणंद रेल्वे    १३      १८४.५५                   ९३.४६              १४७.१०
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग  ५४      ४८०.४६                    १०.०१               २०१
रिंगरोड                  ८३      १८२१.०३                     ३.३१              ८.६८

 

Web Title :- Pune Development Project | Eight thousand acres of land in Pune reserved for projects

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा