Pune Dhankawadi Crime | सावकाराच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, धनकवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- Pune Dhankawadi Crime | खाजगी सावकारांनी (Money Lender In Pune) पैशासाठी तगदा लावून मानसिक त्रास दिला. सततच्या त्रासाला कंटाळून एका भंगार व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकरानगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) तीन खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धनकवडी येथील तळजाई पठार (Taljai Pathar) येथे 6 फेब्रुवारी रोजी घडली आहे. (Pune Dhankawadi Crime)

आजिनाथ सर्जेराव लोखंडे (रा. सर्वे नं. 8, तळजाई मंदिराजवळ, तळजाई पठार, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत आजिनाथ यांच्या पत्नी सारीका लोखंडे यांनी गुरुवारी (दि.22) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रामदास काशिनाथ त्रिंबके (रा. बाभुळगाव, ता. माढा, जि. सोलापूर), व्यास गुलाब यादव (रा. जांभुळवाडी), मयुर विलास साळुंखे (रा. पंचवटी सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) यांच्यावर आयपीसी 306, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती आजिनाथ लोखंडे यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांना आर्थिक अडचण भासल्याने त्यांनी आरोपींकडून वेळोवेळी व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, व्यावसायातील मंदीमुळे त्यांना आरोपींचे पैसे परत करता आले नाहीत. त्यामुळे आरोपींनी पैसे परत कर असे म्हणत पैशांसाठी फिर्यादी यांच्या पतीकडे तगादा लावला होता.

पैसे परत करत नसल्याच्या कारणावरुन आरोपींनी आजिनाथ यांना सतत शिवीगाळ करुन धमकावले.
पैशांची सतत मागणी करुन त्यांना मानसिक त्रास दिला. वारंवार होत असलेल्या मानसिक त्रासाला वैतागून फिर्यादी
यांच्या पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींवर
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

Maharashtra IAS Transfers | राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या ! कविता व्दिवेदी यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी नियुक्ती तर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदी कार्तिकी एन एस यांची नियुक्ती

Pune Bibvewadi Crime | पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणावर धारदार हत्याराने वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR