Pune Dhanori Crime | घरी बोलवून तरुणीसोबत अश्लील चाळे, धानोरी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Dhanori Crime | व्यावसायासंदर्भात चर्चा करण्यासाठी तरुणीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे (Obscene) करुन तिचा विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 12 फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास धानोरी येथील मुंजाबावस्ती येथे (Munjaba Vasti Dhanori) आरोपीच्या घरी घडला आहे.

याबाबत विमाननगर येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने रविवारी (दि.25) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात
(Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन प्रविण चिजवाणी
(वय-35 रा. गोल्डकोस्ट सोसायटी, मुंजाबावस्ती, धानोरी) याच्या विरोधात आयपीसी 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी प्रविण याने पीडित तरुणीला बिझनेस संदर्भात चर्चा करण्यासाठी घरी बोलावून घेतले.

पीडित मुलगी आरोपीच्या घरी चर्चा करण्यासाठी गेली.
चर्चा करत असताना आरोपीने तरुणीचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल
असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण (PSI Mahesh Chavan)
करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना