Pune Dhayari Crime | कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने तरुणाला मारहाण, धायरी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केटरिंग व्यवसायासाठी पाठवलेल्या कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याने एका तरुणाला शिवीगाळ करुन लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच तरुणाच्या वडिलांना देखील लाकडी बांबूने मारहाण केली. हा प्रकार 21 फेब्रुवारी रोजी धायरी येथील अभिनव कॉलेज रोडवर रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला आहे. याबाबत सिंहगड रोड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Dhayari Crime)

याबाबत विशाल रामदास वैष्णव (वय-19 रा. गणेश नगर, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून ओमकार ढेबे (रा. धनकवडी) याच्यासह इतर दोन सथीदारांवर आयपीसी 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्य़ादी यांचा केटरींगचा व्यवसाय आहे तर आरोपी हा फिर्यादी यांना केटरिंगच्या कामासाठी कामगार पाठवतो.
21 फेब्रुवारी रोजी रात्री विशाल वैष्णव घरी जात असताना आरोपींनी त्याला आडवले.
कामगारांचे पैसे देण्यास उशीर केल्याच्या रागातून शिवीगाळ केली.
तसेच लोखंडी पाईपने डोक्यात, मानेवर, पाठीवर मारहाण करुन जखमी केले.
तर इतर दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांच्या वडिलांना लाकडी बांबूने डोक्यात मारुन जखमी केले.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | अखेर मनोज जरांगे यांच्यावर दोन ठिकाणी गुन्हा दाखल, सरकारने कारवाईचा फास आवळला

Pune Warje Malwadi Crime | अश्लील हावभाव करुन डॉक्टर तरुणीचा विनयभंग, वारजे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

Pune Cheating Fraud Crime | मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाखांची फसवणूक, आरोपीला कर्नाटकातून अटक; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी