Pune Dhol Tasha Pathak | पुण्याच्या ‘त्या’ ढोल-ताशा पथकातील 15 मुलींसह 60 जणांना हैद्राबादमध्ये डांबलं होतं, ‘मनसे’च्या रूपाली ठोंबरे-पाटील अन् सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशींनी लढवली ‘शक्कल’, सर्वांची सुखरूप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हैदराबाद (Hyderabad) येथील सिकंदराबाद येथे वादन करण्यासाठी गेलेल्या पुण्यातील ढोल ताशा पथकातील (Pune Dhol Tasha Pathak) 60 तरुण-तरुणींना डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार समजताच पुण्यातील मनसेच्या (MNS) माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) आणि सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी (Ajit Singh Pardeshi) यांनी हैदराबाद येथील स्थानिक नगरसेवक आणि पोलिसांशी संपर्क साधून सर्वांची सुखरुप सुटका केली. पुण्यातील या ढोल-ताशा पथकामध्ये (Pune Dhol Tasha Pathak) 15 मुलींचा समावेश होता.

पुण्यातील ‘स्वीमी ओम प्रतिष्ठाण ढोल-ताशा पथक’ गुरुवारी (दि.16) वादन करण्यासाठी सिकंदराबाद येथे गेले होते.
प्रेमचंद यादव (Premchand Yadav) यांनी या पथकाला वादन करण्याची सुपारी दिली होती.
चार दिवस वादन करण्यासाठी अडीच लाख रुपये देण्याचे ठरले होते.
त्यानुसार हे पथक सिकंदराबाद येथे गेले.

पथकाने ठरल्याप्रमाणे चार दिवस वेगवेगळ्या गावात जावून वादन केले. त्यानंतर त्यांनी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांना आणखी दोन दिवस वादन करण्यास सांगितले.
त्यानुसार पथकाने आणखी दोन दिवस वादन केले. बुधवार (दि.22) पर्यंत वादन करुन हे पथक गुरुवारी (दि.23) पुण्याकडे निघाले.
त्यावेळी त्यांना ठरलेली रक्कम दिली नाही उलट त्यांच्या वाहनांचे कागदपत्र काढून घेतले.
तसेच आणखी दोन दिवस वादन करण्यास सांगून वाद घातले.
मात्र, पथकाने वादन करण्यास नकार दिला.

 

या पथकाला सुपारी देणारे प्रेमचंद यादव यांनी व इतरांनी मुलांना जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. तसेच त्यांना डांबून ठेवण्यात आले.
त्यामुळे पथकातील सर्वजण घाबरले. त्यांनी शुक्रवारी (दि.24) रात्री पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह परदेशी व मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे
यांच्याशी संपर्क साधून सर्व हकिकत त्यांना सांगितली.
रुपाली ठोंबरे आणि परदेशी यांनी तातडीने हालचाल करत सिकंदराबाद येथील नगरसेविका बसेरिया पुजारी (Baseria Pujari) यांच्याकडे संपर्क
साधून त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
तसेच पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून माहिती देण्यात आली.

यानंतर नगरसेविका पुजारी आणि पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत मुला-मुलींशी संवाद साधून त्यांना धिर देत त्यांची सुटका केली.
त्यानंतर सुपारी देणाऱ्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून घेत तडजोड करुन त्यांना पैसे दिले. यानंतर या सर्व मुलांना सुखरुप पुण्याकडे रवाना केले.

 

Web Title : Pune Dhol Tasha Pathak | 60 people, including 15 girls from Pune’s ‘Dhol-Tasha’ group, were stranded in Hyderabad, MNS’s Rupali Thombre-Patil and social activist Ajit Singh Pardeshi fought idea, all were released

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

UPSC Result | ‘महाराष्ट्रात पहिली आलेल्या पुण्याच्या मृणालीनं सांगितलं यशाचं ‘गुपित’

Raosaheb Danve | मंत्री रावसाहेब दानवेंनी पुण्यात भरसभेत दाखवला आपल्या अंगावरचा फाटका शर्ट; म्हणाले…

Personal Loan On Aadhaar Card | कोरोनाने केले बेरोजगार ! ‘या’ पध्दतीनं करा आधार कार्डद्वारे पर्सनल लोनसाठी अर्ज; जाणून घ्या