Pune : पाटील इस्टेटमध्ये कोयता घेऊन परिसरात धुमाकूळ ! तरुणावर सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पाटील इस्टेटमधील स्वयंघोषित “दादाने” हातात कोयता घेऊन तो हवेत घुमवत परिसरात धुमाकूळ घालत एका तरुणावर सपासप वार केल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी अक्षय पवार (वय 26), मीरा कांबळे (वय 30, रा. पाटील इस्टेट) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात आकाश हनवल (वय 25) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश आणि आरोपी एकाच परिसरात आहेत. त्यांची यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याचा राग मनात होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास परिसरात आले. यानंतर मी या पाटील इस्टेटचा दादा आहे, तुला लयं माज आला आहे. तुझा माज उतरवताे, तुझी विकेटच काढतो असे म्हणत हातातला कोयता हवेत गरगर फिरवून धावत फिर्यादीच्या मागे धावला. यामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. नागरिकांनी भीतीपोटी आपली दारे बंद केली. यानंतर आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर सपासप वार केले. तसेच त्यांचे भांडण सोडवण्यास आले असता, त्यालादेखील मारहाण केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्याला पकडले. अधिक तपास उपनिरीक्षक साळवी करत आहेत.

You might also like