लहान मुलांच्या वादातून रविवार पेठेत दोन गटात तुफान हाणामारी

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून रविवार पेठेत दोन गटात चांगलाच राडा होऊन तुंबळ हाणामारीची घटना घडली. नऊ महिलांसह 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत बाळासाहेब चव्हाण (वय 49, रा. रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजय विष्णू साळुंखे(वय 47) व चार महिलांना अटक करण्यात आली आहे. तर, रक्षंदा चव्हाण उर्फ रक्षंदा साळुंखे (वय 24) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळासाहेब चव्हाण, आकाशा चव्हाण (वय 24) यांच्यासह तीन महिलांना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. लहान मुलांमध्ये वाद झाले होते. त्यावेळी सर्वजन एकत्र जमले. त्यातून वादाला सुरूवात झाली. वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. त्यावेळी शिवीगाळकरून एकमेकांना मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

You might also like