पुण्यात दिक्षा महोत्सव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – होलचंद दानाजी गुंदेशा यांच्या परिवारातील पाच सदस्य जैन धर्माच्या रितीरिवाजानुसार दिक्षा घेणार आहेत. (दि. 4 जानेवारी) यानिमित्ताने पुण्यात गंगाधाम चौक येथील नजुश्री सभागृह येथे दिक्षा समारंभाचे आयोजन करण्यात आले असून 8 जानेवारीपर्यंत हा दिक्षा महोत्सव चालणार आहे.

या दिक्षा महोत्सवाचे व महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या नरकावलीचे उद्घाटन पुणे शहर भाजपाच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी गुंदेशा परिवारातील दीपक ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते अचल जैन, नगरसेवक प्रवीण चोरबोले, नगरसेविका राजश्री शिळीमकर, नगरसेवक भरत वैरागे, गुंदेशा परिवार आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

जैन धर्मामध्ये दिक्षा ग्रहण करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमच्या परिवारातील पाच सदस्यांनी दिक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून येत्या 1 फेब्रुवारी रोजी सूरत येथे हा दिक्षा ग्रहण समारंभ होणार आहे. यानिमित्तानेच पुण्यात दिक्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 8 जानेवारीपर्यंत हा दिक्षा महोत्सव सुरू राहणार असून पुणे व परिसरातील भाविकांनी या महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन गुंदेशा परिवारातील दीपक ओसवाल यांनी केले.

होलचंद दानाजी गुंदेशा परिवारातील पाच सदस्य जैन धर्माच्या रितीरिवाजानुसार दिक्षा घेत असून त्यानिमित्ताने आयोजित दिक्षा महोत्सवाचे उद्घाटन पुणे शहर भाजपाच्या अध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी गुंदेशा परिवारातील दीपक ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते अचल जैन, नगरसेवक प्रवीण चोरबोले, नगरसेविका राजश्री शिळीमकर, नगरसेवक भरत वैरागे, गुंदेशा परिवार आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/