Pune : 2 रिक्षा चालकांमध्ये वाद, एकाने केले ब्लेडने मानेवर आणि चेहर्‍यावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन रिक्षा चालकाचे पॅसेंजरवरून झालेल्या वादात एकाने ब्लेडने मानेवर आणि चेहऱ्यावर वारकरून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. येरवड्यात हा प्रकार घडला असून, रिक्षा चालक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

याप्रकरणी तोफीक बांगी (वय 30) याला अटक केली आहे. यात संभाजी मदने (वय 30) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदने आणि बांगी दोघेही रिक्षा चालक आहेत. गुंजन चौकात ते रिक्षा लावतात. बांगी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

दरम्यान या दोघात यापूर्वी वाद झाले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात पॅसेंजर घेण्यावरून वाद झाले होते. या रागातून बांगी याने शिवीगाळ करत तोंडावर बुक्की मारत ब्लेडने गळ्यावर गालावर वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.