पुणे जिल्ह्यात वाळू चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींवर बोजा आणि जेसीबी यंत्रांवरही कारवाई

दौंड :पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव येथे वाळू उपसा होत असलेल्या अनेक शेत जमिनींवर आता महसूल खात्याने बोजा चढविण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे किरकोळ पैश्यांच्या हव्यासापायी वाळू माफियांना कवडीमोल भावात देण्यात आलेली वाळू आता शेतकऱ्यांच्या अंगलट येत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच देशमुख मळा येथील एका शेतजमिनीवर लाखो रुपयांचा बोजा चढविण्यात आला असून, दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एक वाळूचा मोठा साठा आणि ज्या शेत जमिनीमधून ती वाळू चोरण्यात आली होती ती शेतजमीनीचा महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा करून त्यावर लवकरच बोजा चढविण्यात येणार आहे.

या शेतजमिनीमधून ज्या जेसीबी यंत्राच्या साहाय्याने वाळू चोरी करण्यात आली ती जेसीबी यंत्रेही जवळीलंच असल्याची माहिती मिळत असून आता त्या जेसीबी यंत्रांवर काय कारवाई करण्यात येते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर शेतकऱ्यांनी वाळू उपश्यासाठी दिलेल्या जमिनींवर आता महसूल खात्याने कारवाई सुरू केली असून शेतीवर बोजा चढवतानाच संगनमताने वाळू माफियांसोबत वाळू चोरीमध्ये सहभाग सिद्ध झाल्यास आता त्यांच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे शेतीवर बोजा आणि अंगावर वाळू चोरीचा गुन्हा अशा दुहेरी संकटामध्ये सध्या शेतकरी सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने अनधिकृतपणे आपल्या शेतातील वाळूचा उपसा कुणाला करू देऊ नये आणि स्वतःही तो करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई तर केली जाईल. पण शेत जमिनीवर बोजाही चढवण्यात येणार असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली आहे.

एक ट्रक मालक आणि पीडित शेतकऱ्याने दिलेल्या माहिती नुसार केडगाव परिसरामध्ये वाळू माफिया शेतकऱ्यांना एक ट्रक वाळूच्या मोबदल्यामध्ये पाच हजार रुपये देत आहेत आणि स्वतः मात्र एका ट्रक मागे सुमारे वीस ते बावीस हजार रुपये ट्रक मालकाकडून घेत आहेत. शेतकऱ्याचे पाच हजार रुपये गेल्यानंतर वाळू माफिया एका ट्रक मागे सुमारे पंधरा हजार रुपये निव्वळ नफा मिळवत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या शेतीवर महसूल खात्याकडून बोजा चढविण्यात आल्यानंतर हेच वाळू माफिया आपली जबाबदारी झटकून मोकळे होत आहेत. त्यामुळे तात्पुरत्या किरकोळ पैशाच्या हव्यासापायी शेतकरी आपल्या शेतातील वाळू ही वाळूमाफियांना देऊन स्वतःचेच नुकसान करून घेत आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like