Pune District Administration | कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune District Administration | कोरोना महामारीत जिल्ह्यातील 26 बालकांनी आपले आई वडील गमावले आहेत. पालकांच्या उत्तार्धात संपत्तीचा अधिकार हा बालकांकडेच असावा, बालकांचा संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने (Pune District Administration) अशा बालकांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh, Pune) यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय कृती दलाच्या आयोजित बैठकीमध्ये याबाबत महत्वपूर्ण निर्णय पुणे जिल्हा प्रशासनाकडून (Pune District Administration) घेण्यात आला आहे.

pune district administration right child property parents who lost their lives due

या बैठकीदरम्यान बोलताना जिल्हाधिकारी देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) म्हणाले, कोरोनामुळे ज्या बालकांचे पालक दगावले आहेत.
अशा बालकांना बाल संगोपन योजने अंतर्गत मदत मिळावी म्हणून कृतीदलाची (Task Force) ची स्थापना करण्यात आलीय.
अशा बालकांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनामुळे पालक गमावलेले अशा बालकांचा सांभाळ योग्य रीतीने होतो की नाही.
यासंदर्भात खात्री करून घ्यावी, त्यासाठी घरी जाऊन भेटी द्याव्यात, असे निर्देश देखील जिल्हाधिकारी डॉ. देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय कृती दलाच्या आयोजित बैठकीमध्ये पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh), निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे (Jayashree Katare), जिल्हा बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे (Ashwini Kamble), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद (param anand) यांच्यासह जिल्हास्तरीय कृती दलाचे आदी सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना –

– चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. याची दक्षता घेण्यात यावी.

– कोविडच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे, निरीक्षणगृहांकरीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकिय पथक नियुक्त करण्यात यावीत.

– दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे.

– बालकांची सर्वतोपरी काळजी घेण्यासोबतच बालकाचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेणे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : pune district administration right child property parents who lost their lives due

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई;
भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Pradeep Sharma | एन्काऊंटर फेम माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी NIA चा छापा

PF Account | नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ! EPFO ने कोट्यवधी PF खातेधारकांना दिला दिलासा; दुसर्‍यांदा घेऊ शकतील अ‍ॅडव्हान्स