जिल्हा काँग्रेस कमेटीकडून पुणे जिल्ह्यातील 7 विधानसभा जागांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघापैकी आघाडीच्या किमान 7 जागा काँग्रेस पक्षाला मिळाव्यात. तसेच भोर, इंदापूर आणि पुरंदर या काँग्रेस पक्षासाठी त्वरीत जाहीर कराव्यात अशी मागणी पुणे जिल्हा काँग्रेस कमेटीने केली आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमेटीची आज काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ही मागणी करण्यात आली.

सात जागांची मागणी करुन जुन्नर, मावळ, खेड व खडकवासला या जागांची पक्षाने मागणी करावी अशी मागणी शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे. संघात्नामक ताकद व निवडून येण्याची क्षमता असताना जर वरील जागा मिळाल्या नाहीत, तर पुणे जिल्यातील सर्व 11 विधानसभा मतदारसंघ काँग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला आहे.

या बैठकीला पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, माजी अध्यक्ष देविदास भन्साळी, प्रदेश प्रतिनिधी दत्तात्रय गवळी व कौस्तुभ गुजर, वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, खजिनदार महेश ढमढेरे, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ दौंडकर, जिल्हा महिला अध्यक्ष सिमा सावंत, महिला उपाध्यक्ष अर्चना शहा, लहुआन्ना निवंगुणे- बारामती लोकसभा अध्यक्ष, वैभव यादव-शिरूर अध्यक्ष, गंगाराम मातेरे- मुळशी, राजू इनामदार- आंबेगाव, सचिन बराटे- खडकवासला. तसेच, निखील कवीश्वर, अतुल कारले, नंदू चौधरी बाळासाहेब प्रताप, कृष्णाजी शिंगारे, खंडू तिकोन, विजय डीम्बर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –