पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune District Consumer Protection Council | जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्तींनी ११ एप्रिल पर्यंत विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रां जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदे सह अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने (DSO Surekha Mane) यांनी केले आहे.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २८ अशासकीय सदस्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. महानगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, ग्राहक संघटना सदस्य, शाळा/महाविद्यालयातील सदस्य, वैद्यकीय व्यवसायिक, व्यापार व उद्योग क्षेत्र, पेट्रोल व गॅस विक्रेते, शेतकरी यामधून सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
विहित नमुन्यातील अर्ज तसेच अटी, शर्ती व निकषांच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
Web Title : Pune District Consumer Protection Council | Invitation to apply for non-governmental member selection on Pune District Consumer Protection Council
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा