Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1515 नवे पॉझिटिव्ह, विभागात आतापर्यंत 32634 बाधित झाले बरे, जाणून घ्या 5 जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे विभागातील 32 हजार 634 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 922 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 666 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 708 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.32 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.13 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 44 हजार 361 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 27 हजार 700 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 478 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 453 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 2 हजार 73 रुग्ण असून 1 हजार 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 854 आहे. कोरोनाबाधित एकूण 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 497 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 484 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 658 आहे. कोरोना बाधित एकूण 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 776 रुग्ण असून 402 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 352 आहे. कोरोना बाधित एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 515 कोरोना बाधीत रुग्ण असून 898 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 580 आहे. कोरोना बाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 24 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 515, सातारा जिल्ह्यात 124, सोलापूर जिल्ह्यात 192, सांगली जिल्ह्यात 78 तर कोल्हापूर जिल्ह्यात 115 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 70 हजार 41 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 66 हजार 395 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 646 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 12 हजार 611 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 53 हजार 222 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 16 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )