Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एक ‘कोरोना’चा रूग्ण आढळला, पुण्याचा आकडा 17 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गेल्या 24 तासात आणखी एक कोरोनाचा रूग्ण आढळून आली असून आता एकुण संख्या 17 वर पोहचल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, ज्यांना क्वांरटइन करण्यात आलेल्या तब्बल 32 रूग्णांची टेस्ट ही नकारात्मक आल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ज्यांना कोणाला स्वतःला कोरोनाची लक्षणं जाणवली किंबहुना ज्यांच्यामध्ये प्रशासनाच्या पथकास कोरोनाची लक्षणं जाणवली अशा 18 नवीन लोकांना क्वांरटाईन करण्यात आल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये एकुण 150 पथकांकडून सर्वेक्षण चालू आहे. बालेवाडी येथे देखील क्वांरटाइनची व्यवस्था करण्यात येणार आहे. पिंपरीमध्ये नवीन आढळून आलेला रूग्ण हा अमेरिकेतून दुबई मार्गे मुंबई आणि तेथून पिंपरीत आलेला आहे. तो कोणा-कोणाच्या संपर्कात आला त्याबाबत माहिती घेण्यात येत आहे. सोमवारी तब्बल 7000 घरांमधील 21 हजार 583 जणांची तपासणी झाली आहे. त्यामध्ये केवळ 5 संशयित आढळून आले असून त्यांना नायडू हॉस्पीटल आणि वायसीएममध्ये दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 26 हजार 315 घरांची तपासणी झाली असून तब्बल 1 लाख 17 हजार 336 जणांचं स्क्रीनिंग झालं आहे.

31 मार्चपर्यंत आधारकार्ड नाही
31 मार्च पर्यंत नवीन आधारकार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध नसणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयात देखील गर्दी होत असते त्यामुळे परिस्थिती सामन्य झाल्यानंतरच आरटीओ कार्यालयात परवाना नुतणीकरणासाठी नागिरिकांनी जावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नुतणीकरणासाठी ऑनलाइनचा पर्याय चालकांसमोर आहे.

पीएमपीएमएल बस संख्या कमी
पीएमपीएमएल बसची संख्या कमी (हॉस्पीटल आणि परिक्षा केंद्र रूट सोडून) करण्यात आली आहे. बसेसचं शेडयूल 1714 वरून 1131 वर आणण्यात आलं आहे अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली आहे.