Pune : ज्ञानेश्वर साळुंके आणि सागर साळुंके या पितापुत्राचे कोरोनामुळे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  हडपसर (विठ्ठलनगर, 15 नंबर) येथील ज्ञानेश्वर विजय साळुंके (वय 48) यांचे 6 मे 2021 तर, त्यांचा पुत्र सागर ज्ञानेश्वर साळुंके (वय 27) यांचे 13 मे 2021 रोजी कोरोना महामारीच्या आजाराने निधन झाले. ज्ञानेश्वर साळुंखे याच्यामागे पत्नी, एक मुलागा आणि मुलगी असा परिवार आहे, तसेच सागर यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे.

सागरचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. सागर उत्तम बासरीवादक आहे. झी युवाच्या संगीत सम्राट कार्यक्रमात उपविजेते ठरले होते. कलर्स मराठी वाहिनीवर श्री स्वामी समर्थ, सुंदरा मनामध्ये भरली, चंद्र आहे साक्षीला या कार्यक्रमामध्ये त्यांनी बासरीवादनाची भूमिका सांभाळली आहे. साळुंके कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सागर याने अल्पावधितच दूरचित्रवाहिणीवर आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. साळुंके पितापुत्रांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.