पुणे : पूर्व भागातील गणेशोत्सव बंद करू नका; अप्पर पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील पुर्व भागातील गणेशोत्सव बंद पडू नये यासाठी पुर्व भागातील गणेश मंडळांनी अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर यांना लेखी निवेदन दिलं आहे. या लेखी निवेदनात गणेश भक्तांच्या गैरसोयीबद्दलची व्यथा मांडण्यात आली आहे.

गणपतीच्या काळामध्ये बेलबाग चौकाकडून म्हणजे डुल्या मारूती, अल्पना टाॅकीज, नाना पेठ, गणेश पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ, भवानी पेठ या परिसरामध्ये पोलिस गणेशभक्तांना येऊनच देत नाहीत. त्यामुळे हजारो गणेशभक्तांची गैरसोय होते. कारण बेलबाग आणि सोन्या मारूती चौकात बॅरीकेटस लावलेले असतात. त्यामुळे हजारो गणेश भक्तांची गैरसोय होते, असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.

पिंपरी-चिंचवड :  वर्गणी न दिल्याने माताजी सुपर मार्केटची तोडफोड

काही दिंवसांपुर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मा. कलेक्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये गणेश मंडळांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीत रविंद्र माळवदकर आणि अजय भोसले यांनी प्रत्यक्ष याबाबत माहिती दिली होती. मात्र अद्याप गणेशभक्तांची गैरसोय सुरूच आहे. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे पुर्व पश्चिम रोडवर गणेश भक्तांना वावरण्याची संधी द्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B07G5BTYC2,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d7301724-ba6b-11e8-b36a-1383383b1b9e’]