Pune : ‘गँगस्टर गज्या मारणे कोण आहे माहिती आहे का? मिरवणुक आम्हीच काढली होती’; मारहाण करून सावकारी करणारा ‘गोत्यात’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘गँगस्टर गज्या मारणे( Gaja Marane) कोण आहे माहिती आहे का? यांची मिरवणुक आम्हीच काढली होती’, अशी धमकी देऊन मारहाण करणारा व सावकारी करणार्‍यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण बबन थोरात (वय ३४, रा. शिवांजली कॉर्नर, अभिनवनगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी श्रीराम किनगे (वय ५२, रा. पवारनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. किनगे हे फिल्ट रिपेअरिंगचे काम करतात. त्यांनी २०१८ मध्ये प्रविण थोरात याच्याकडून १० टक्के व्याजाने ४० हजार रुपये घेतले होते. त्याचे व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाहीत. तसेच मुद्दलाची रक्कम परत द्यावी, यासाठी प्रविण याने फिर्यादीला शिवीगाळ करुन त्याच्या घरात कोंडून ठेवले़ ‘‘तुला आता येथेच कोंडुन ठेवतो़ तुला इथून नागडे पाठवितो, तुझे तंगडे तोडतो,’’ असा दम देऊन फिर्यादीला चापटी मारल्या.

तसेच ‘‘गज्या मारणे कोण आहे माहिती आहे का? त्याची मिरवणुक आम्हीच काढली होती. तसेच शितोळेचे हात कोणी तोडले होते माहित आहे काय ?’’ अशी फिर्यादीच्या मनाला भिती दाखवून माझे मुद्दलाचे पैसे कधी देणार असा दम दिला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रविण थोरात याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक एम. डी. वरुडे अधिक तपास करीत आहेत.

 

Video : भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याला पोलिसांकडून थर्ड डिग्री, अक्षरशः अंगावर काटा आणणारा Video Viral झाल्याने प्रचंड खळबळ; जालन्यातील धक्कादायक घटना

रक्ताची कमतरता असल्यास आहारात ‘या’ 12 सुपर फूड्सचा समावेश करा, जाणून घ्या

Good News : कोरोनाशी लढण्यासाठी आणखी एक शस्त्र, भारताला जुलैपासून मिळू शकते फायजरची लस

तुळशीसह ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, फुफ्फुसे एकदम मजबुत अन् निरोगी बनतील, जाणून घ्या

फेसबुकने बदलले धोरण : ’लॅबमध्ये तयार झाला कोरोना’ असा दावा करणारी पोस्ट करणार नाही डिलिट

Nutrients For Women : तंदुरुस्त राहण्यासाठी महिलांनी आहारात ‘या’ 5 पोषक तत्वांचा करावा समावेश, जाणून घ्या