Pune : डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत असताना कात्रज बोगद्याजवळ…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेलात जेवनकरून परत येत असताना कात्रज नवीन बोगद्याजवळ डॉक्टरला पिस्तूलाचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरटे दुचाकीवरुन आले आणि त्यांच्याजवळील सव्वा लाखांचा ऐवज घेऊन गेले आहेत.
याप्रकरणी डॉ. चिन्मय विठ्ठल देशमुख (वय ३२, रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. चिन्मय आणि त्यांच्या पत्नी रविवाारी रात्री खेड शिवापूर येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेेलेे होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास कारने ते पुण्याकडे परत येेेत होते. त्यावेळी डॉ. चिन्मय यांनी लघुशंका करण्यासाठी कार रस्त्यालगत थांबविली. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने पिस्तुल बाहेर काढत डॉ. चिन्मय यांना धाक दाखविला. त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत पत्नीकडील दोन सोन्याच्या अंगठ्या, मनगटी घड्याळ असा मिळून १ लाख २० हजारांचा ऐवज चोरुन नेला. अंधाराचा फायदा घेउन चोरट्यांनी लुटले आहे. उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करत आहेत.