Pune : चंदननगर पोलिस ठाण्यात पाणी शिरल्यानं कागदपत्रे अन् संगणकाचे नुकसान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात बुधवारी झालेल्या धुवाधार पावसाने सोसायट्या अन दुकाने बुडवली तस चंदननगर पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरले. यामुळे कागदपत्रे व संगणक भिजून नुकसान झाले आहे. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.

बुधवार धुवाधार पावसाचा ठरला. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दुकाने, घरे आणि सोसायटीत पाणी शिरले होते. तर रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. या पावसाच्या पाण्याने पुण्यातील पोलीस ठाणे देखील सोडले नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर अचानक चंदननगर पोलीस ठाण्यात पाणी शिरले. रात्री हा प्रकार घडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. रात्रपाळी कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे व संगणक प्रणाली भिजू नये यासाठी धावपळ झाली होती. पण अचानक आलेल्या पाण्याने काही कागदपत्रांसह संगणकही पाण्यात भिजले गेले. तब्बल दोन ते तीन अडीच तास सुरु असलेल्या पावसामुळे पाण्याचे लोट पोलीस ठाण्यात शिरले होते. अखेर पाउस थांबल्यानंतर पाणी बाहेर काढल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे.

दरम्यान नागरिकांना वाचविण्यासाठी आणि त्यांना धोक्याची माहिती देणाऱ्या पोलिसावरच पोलीस ठाणे वाचविण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली.