Video : पुणे पोलीस आयुक्तांनी शेअर केला ‘तो’ माणुसकीचा व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन – कुत्रा हा माणसाचा अत्यंत जवळचा मित्र असून नि:स्वार्थ मनाने हा मुका जीव मालकावर प्रेम करत असतो, अनेक वेळा त्याच्यावर येणारे संकट दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. सोशल मीडियावर अनेक वेळा कुत्र्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरलही झाले आहेत. मात्र सध्या येथील एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. एका अंध व्यक्तीच्या मार्गात आलेली लाकडाची काठी बाजूला सारुन या कुत्र्याने त्या व्यक्तीला मदत केली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ट्विटर खात्यावर कुत्र्याच्या माणुसकीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये कुत्रा मालकीणीसोबत निघाला आहे. त्याचवेळी एका अंध व्यक्तीही त्याच मार्गाने जात होता. त्याच रस्त्यावर एक लाकूड आडवे पडलेले होते. कुत्र्याच्या त्याच क्षणी लक्षात आले की, अंध व्यक्तीचा पाय लाकड्याच्या काठीमध्ये अडकून तो पडू शकतो. त्यावेळी कुत्र्यानं ते लाकूड आपल्या तोंडाने रस्त्याच्या बाजूला सारले. कुत्रा घेऊन फिरायला येणार्‍या मालकीणीने ते लाकूड पाहिले होते. मात्र, तिने लाकूड बाजूला सारायचा विचारही केला नाही. पण कुत्र्याने माणूसकी दाखवून दिली. 23 सेकंदांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. तब्ब्ल 6 लाख 47 हजार जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर पाच हजार जणांनी रिट्विट केला आहे.