शहरातील प्रसिद्ध श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील दानपेटी चोरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – देशातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ख्याती आणि राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदीरातून चोरट्यांनी दानपेटी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.
याप्रकणी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे सचिव दिलीप आडकर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यानुसार दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या व विश्रामबाग व फरासखाना अशा दोन मुख्य पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच हे मंदीर आहे. गणपती मंदिरात स्टीलची दानपेटी ठेवली जात होती. ही दानपेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते. परंतु, दि 26 नोव्हेंबर रोजी पहाटे अडीज वाजता दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येऊन मंदिराचा दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे 1 हजार 500 रूपये असलेली दानपेटी चोरून दुचाकीवरून पोबारा केला असल्याचे ट्रस्टचे कायदेशिर सल्लागार अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले.

गणपती मंदिरात सीसीटिव्ही आहेत. गणपती मंदिरात भाऊसाहेब रंगारी यांनी स्वतः तयार केलेला लाकडी रथ व गणपती ची मुर्ती त्या ऐतिहासिक लाकडी रथावर सुमारे 129 वर्षा पासून विराजमान असते व तीच मुर्ती गणेशोत्सवात दहा दिवसाकरिता प्रतिष्टापना करून बसवली जाते. त्यामुळे ऐतिहासिक वास्तु असलेल्या ठिकाणी चोरी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यानुसार पोलीस या चोरट्यांचा माग काढत आहेत.

Visit : Policenama.com