‘कोरोना’मुळे नाट्यसमीक्षक डॉ. मधुरा कोरान्ने यांचे निधन

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे नाट्यसमीक्षक आणि प्राध्यापक डॉ. मधुरा कोरान्ने यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी नाटकांवर अनेक समीक्षणे आणि पुस्तके लिहिली आहेत. त्या मॉर्डन कॉलेजमध्ये प्राध्यापिकाही होत्या. प्रकृती खालवल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या होत्या. त्यावेळी त्यांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली होती.

मधुरभाष, बोलता…बोलता… (नाट्यविषयक मुलाखती), काव्यललित (काव्यसंग्रह), नाट्याक्षरे, स्त्री नाटककारांची नाटके, न्यायालय आणि मराठी नाटक, नाट्यगंध, मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा, एकपात्री प्रयोग : स्वरूप आणि कलारूप, मनमोहिनी, शब्दललित, स्त्री समस्या आणि आजचे नाटक, स्री-नाटककारांची नाटके ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. याशिवाय त्यांना नाट्यसमीक्षणासाठी माधव मनोहर पुरस्कारही मिळाला आहे.