कचरा वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाचा अपघाती मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कचरा गोळा करणार्‍या ट्रॅक्टरवरील नियत्रंण सुटून झालेल्या अपघातात चालकाचे निधन झाले. येवलेवाडी परिसरात ही घटना गुरुवारी सकाळी घडली. पांडुरंग लक्ष्मण गायकवाड (वय 40, रा. येवलेवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कचरा गोळाकरून तो खाली करण्याचे काम गायकवाड करत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी ते कचर्‍याने भरलेला ट्रॅक्टर खाली करण्यासाठी येवले वाडी येथील दादा धांडेकर खाणीजवळ निघाले होते. परंतु, ट्रॅक्टरवरील नियत्रंण सुटल्याने भीषण अपघात झाला. यात त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like