ड्रायव्हरनेच विकली परस्पर कार, गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टुरिस्ट व्यावसायिकाकडे असणार्‍या ड्रायव्हरनेच कार भाड्याने देणार असल्याचे सांगत ती परस्पर विकून 7 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी निकिता कारिया (वय 23, रा. औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कोल्हेवाडी परिसरात राहणार्‍या ड्रायव्हर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टुरिस्टचा व्यावसाय असून, त्यासाठी त्यांच्याकडे अनेक वाहने आहेत. त्यावर आरोपी हा ड्रायव्हर म्हणून नोकरीस होता. दरम्यान, त्याने फिर्यादींच्या वडिलांच्या नावावर असणारी इनोव्हा टोयाटो कार फिनोलेक्स कंपनी चिंचवड येथील त्याचा मित्र तुषार याला महिन्याभरासाठी भाड्याने देणार असल्याचे सांगून नेली. मात्र, त्यानंतर आरोपीने फिर्यादींचा विश्वासघात करून ही कार गोपाल नावाच्या व्यक्तीला विकुन त्यांची 7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.