Pune Drug Case | आमदार रविंद्र धंगेकर म्हणतात, सीआयडी कडे तपास द्या; देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘त्याला पण…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) पळून गेल्यानंतर कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणा किंवा सीआयडीकडे (CID) सोपवावा अशी मागणी केली होती. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ललित पाटीलला आम्ही शेधून काढू असा विश्वास व्यक्त केला आहे. (Pune Drug Case)

ललित पाटील पळून गेल्यानंतर राज्यात ड्रग्सची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. यामागे खास मिशन असल्याचे समोर आले आहे. याबाबत खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. ललित पाटील दोन आठवड्यापासून फरार आहे. अद्याप तो सापडलेला नाही. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, तो पण सापडेल कुठे जाणार? शोधून काढू त्याला, त्याचे जे साथीदार बंधू होते ते सापडलेत ना? तो ही सापडेल, असं फडणवीसांनी सांगितलं. (Pune Drug Case)

आता टार्गेट ड्रग्स

मी ज्यावेळी क्राईम कन्ट्रोल कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा सर्व युनिट्सला सांगितलं होतं की, आता आपलं टार्गेट ड्रग्स आहे. सर्व अधिकाऱ्यांना ड्रग्सवर कारवाईचे निर्देश दिले होते. सर्व अधिकाऱ्यांनी त्याबद्दल काय कारवाई केली पाहिजे याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सर्वांनी त्याच्यावर कडक करावईला सुरुवात केली आहे. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. आता हळूहळू राज्यातील सर्व ठिकाणचे पोलीस त्याबद्दल कारवाई करत आहेत. केंद्र सरकारही यावर लक्ष केंद्रित करत आहे.

जिल्हा पातळीवर समित्या

जिल्हा पातळीवर समित्या स्थापन केल्या असून त्या समित्या कारवायांवर लक्ष ठेवून असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत ही समिती केली आहे.
त्या त्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस आयुक्त हे सगळे त्या कमिटीचे भाग आहेत.
त्यामुळे यापुढे याही पेक्षा मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु राहिल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1713855651074691292?s=20

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Sanjay Raut On CM Eknath Shinde | संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांना ‘समाजवाद’ शब्द माहित आहे का?’

Rohit Pawar On Ink Splash On Chandrakant Patil | शाई फेक योग्य नाही – आमदार रोहित पवार

Amol Mitkari | भंगार पुस्तकाच्या विक्रीसाठी बोरवणकर यांचे अजितदादांवर आरोप – अमोल मिटकरी

Pune Police MPDA Action | पुणे शहरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 49 वी स्थानबध्दतेची कारवाई