Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : येरवडा कारागृहातील जेल पोलिसाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पथकाने ललित पाटील प्रकरणात (Drug Mafia Lalit Patil) कारागृहातील पोलीस कर्मचारी मोईज शेख याला मंगळवारी अटक केली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) कर्मचारी महेंद्र शेवते याला अटक केली आहे. (Pune Drug Case)

ललित पाटील प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्याकडे केली होती. ललित पाटील ससून रुग्णालयातून कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थ मेफेड्रॉन विक्रिचे व्यवहार करत होता. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने ससूनचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर (Dr Sanjeev Thakur) यांना पदमुक्त केले. ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवते हा रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पैशांची देवाण-घेवाण करण्यात मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता. (Pune Drug Case)

येरवडा कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी. तसेच महेंद्र शेवते (Mahendra Shevte)
याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, ललित पाटील प्रकरणात चौकशीनंतर गुन्हे शाखेने शेवते
आणि पोलीस कर्मचारी मोईज शेख याला अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना एक डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी
सुनावली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”

Sudamrao Landge Passed Away | पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

Pune Pimpri Crime News | हटकले म्हणून तरुणावर दारूच्या बाटलीने जीवघेणा हल्ला, आकुर्डी येथील घटना