Pune : मद्यधुंद कार चालकाचा हडपसरमध्ये IBM समोर धुमाकूळ, नागरिकांना उडवल्यानं परिसरात खळबळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मद्यधुंद कार चालकाने हडपसरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत नागरिकांना उडविल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली असून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. हडपसर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले आहे.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, भेकराई नगरमधील IBM समोर मद्यधुंद असणाऱ्या स्विफ्ट कार चालकाने राडत्यावरील गाड्याना ठोकर मारत काही अंतर फरफटत नेले. यात त्याने तीन गाड्याना उडवले आहे. अचानक रहदारीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. नागरिक सैरभैर पळत असतानाच कार धडकून थांबली. त्यानतर नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांना माहिती दिली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. अद्याप या घटनेत किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती मिळालेली नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…