Coronavirus Impact : कुणी प्रवाशी देतं का प्रवाशी ! पुण्यात 40 हजार रिक्षा चालक ‘हतबल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे संपुर्ण व्यवहार ठप्प झाले असून त्याचा सर्वात मोठा दणका हातावर पोट असणार्‍या व्यवसायिकांना बसला आहे. विशेषतः. मागील चार ते पाच दिवसांपासून पुण्यात गजबजलेल्या रस्त्यावर स्मशान शांतता पसरली आहे. त्यातच पृवाशी नसल्यामुळे तब्बल 40 हजार रिक्षााचालक हतबल झाले आहेत.

बहुतांश रिक्षाचालकांचा संसार आणि रोजीरोटी रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, कोरोना व्हायसरमुळे अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले आहे. त्यामुळे रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरातून निघाल्यानंतर संध्याकाळी माघारी परतेपर्यंंत 100 रुपयांही धंदा होत नसल्याने अनेकांनी हतबलता व्यक्त केली आहे. घरभाडे, रिक्षा गॅस, रिक्षाचे भाडे देतानाही नाकी नउ आले आहे.

31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यलय, व्यायामशाळा, गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय शाासनाने घेतला आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांवर कुणी पवाशाी देता का पृवाशी अशी म्हणण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात अर्जुन काळे रिक्षाचालकाने सांगितले, साहेब मागील 20 वर्षांपासून पुण्यात रिक्षा चालवतोय, हे दिवस कधी पाहिले नव्हते. कधी एक हजाराखााली आलो नाही. आता गॅसचे पैसे सुदधा मिळत नाही. कोरोनामुळे संसारही मेटाकुटीला आल्याचे सांगितले.