Coronavirus Impact : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांची आठवडा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सोशल डिस्टन्स असा संदेश देत पोलीस दलात बहुचर्चित असणारी आठवडा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. यात 88 अधिकारी सहभागी झाले होते.

पुणे पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दर मंगळवारी आढावा बैठक सुरू केली आहे. अपवादात्मक अडथळा वगळता या बैठकीत खंड पडलेला नाही. पुणे पोलीस दलातील महत्वाच्या बैठकांमधील असणारी आठवड्याची टीआरएम बैठक प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाली.

बैठकीत गुन्हेगारी कमी व्हावी, प्रलंबीत प्रकरणांचा आढावा तसेच गुन्ह्यांचे स्टेट्स आणि त्यावर काही सूचनांसाठी टीआरएम (ट्यूजडे रिव्ह्यूव मिटींग) बैठक घेतली जाते. दरम्यान जगभरात थैमान घातलेल्या कोरोना राज्यासोबतच पुण्यात येऊन धडकला आहे. राज्यात सर्वाधिक पुण्यात आहेत. शासनांकडून शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यक्रम, सभा तसेच शासकीय कार्यक्रम तर रद्द करण्यात आले आहेतच. पण, विनाकारण गर्दी न करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे पोलीसांकडून पोलीस आयुक्तालयात होणारी टीआरएम बैठक रद्द करत ती व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे घेण्याचा निर्णय घेतला होता. ती बैठक विनाअडथळा पार पडली.

बैठीकाला 88 अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सर्वांना काही सूचना केल्या. कोरोनाबाबत घावयाची काळजी. नागरिकांनी काय करावे, हद्दीतील परिस्थिती याची माहिती घेतली. तर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनाही यावेळी सांगण्यात आल्या आहेत. तसेच सर्वांना मास्क, सॅनीटायझर मिळाले का याची देखील खात्री करून सर्वांनी स्वतःची काळजी घेण्यासोबतच परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे सांगितले आहे. यावेळी अशोक मोराळे यांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

तसेच पोलीस उपायुक्त यांच्या होणाऱ्या बैठका देखील अश्याच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात यावे असे सांगितले गेले आहे. त्यामुळे सर्व बैठका या काही दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणार आहेत.
पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या या सोशल डिटन्सची चांगलीच चर्चा होत असून, कौतूक होत आहे. सर्वांनी या पद्धतीने काम केल्यास उत्तम होईल असे नागरिक म्हणू लागले आहेत. त्यामुळे राज्यात शक्य असतील तेथे अश्या पद्धतीने काम करण्याची आज गरज आहे.