Pune : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात कडक Lockdown च्या काळात ‘योगनिद्रा’ स्पा व ‘फेमिना’ स्पा राजरोसपणे होते सुरू, गुन्हे शाखेच्या ‘सासू’ विभागाने छापा टाकून केली कारवाई, 9 महिलांची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्क भागात दोन वेगवेगळ्या मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले बड्या “सेक्स रॅकेट”चा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. दोघांना पकडत येथून तबल 9 महिलांची सुटका केली आहे. दरम्यान, शहरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. कडक लॉकडाऊनमध्ये कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत मसाज सेंटर चालूच कसे झाले अन् तिथं भलताच उद्योग कसा चालू होता. याबाबत शंका आहे.

शुभम प्रेमकुमार थापा (वय 22) व अफताबुद्दीन नुरुद्दीन (वय 27) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर चांदबिबी रमजान मुजावर आणि अब्दुल असिफ हे दोघे फरार आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कडक संचारबंदी आहे. त्यातही हॉटेल लाईन, स्पा, मसाज सेंटर हे गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. तर अत्यावश्यक अस्थपणा सोडून इतर सर्वकाही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानंतरही कोरेगाव पार्क परिसरात योगनिद्रा स्पा व फेमिना स्पा या दोन ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याची खात्री केली. त्यावेळी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने याठिकाणी छापा टाकत या दोन ठिकाणाचा पर्दाफाश केला. यावेळी योगनिद्रा स्पाचा मॅनेजर शुभम थापा याला पकडले. तर फेमिना स्पा येथील मॅनेजर अफताबुद्दीन याला पकडले. तर याठिकानावरून 9 महिलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्या महिला व मुलींना महिला संरक्षण ग्राहक ठेवण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण व त्यांच्या पथकाने केली आहे.