Pune : पूर्व हवेली भाजपच्या वतीने तृणमूल काँग्रेसच्या भ्याड हल्ल्याचा निषेध

पुणे : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची कार्यालये, घरांचे नुकसान करीत हिंसक कृत्य करीत भ्याड हल्ला केला. त्याच्या निषेधार्थ पूर्व हवेली भाजपच्या वतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना निवेदन दिले.

याप्रसंगी भाजपा हवेली तालुक्याचे अध्यक्ष सुनील कांचन पाटील, व्यापारी आघाडी भाजपा पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास जगताप, भाजपा हवेली तालुक्याचे उपाध्यक्ष विलास कुंजीर, भाजपा पूर्व हवेलीचे नेते कमलेश काळभोर, भाजपा हवेली तालुका सरचिटणीस गणेश चौधरी उपस्थित होते.