Pune Education News | RTE 25 % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार पासून सुरु, पालकांना मिळणार 20 दिवसांचा कालावधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षण (education) हक्क कायद्यांतर्गत (RTE) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (दि.11) पासून सुरु करण्यात येणार आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी 20 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षण education संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.
पालकांना शुक्रवारपासून प्रवेशाची तारीख मिळणार
शिक्षण education संचालनालयाने 7 एप्रिल रोजी प्रवेशाची सोडत जाहीर केली होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली नव्हती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून शाळांनी पालकांना प्रवेशासाठी पोर्टलवर दिनांक द्यावेत आणि आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकांनी तात्पूरता प्रवेश निश्चित करावा
ज्या बालकांना लॉटरी लागली आहे.
त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पूरता प्रवेश निश्चित करावा.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व लॉकडाऊन या कारणामुळे जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येवू शकणार नाहीत.
अशा बालकांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनीद्वारे, ई-मेल, व्हॉट्सअॅप द्वारे शाळेशी संपर्क करुन प्रवेशाची कारवाई पूर्ण करणे आवश्यक आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून निर्णय घ्यावा
निवड यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कोरोना परिस्थिती वेगळी आहे.
त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबात निर्णय घ्यावा.
असे स्पष्ट आदेश विभागीय शिक्षण education उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.
Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत