Pune : भरधाव वाहनाच्या धडकेने ज्येष्ठाचा मृत्यू, चंदननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. खराडी बायपास रस्त्यावर हा अपघात झाला आहे. भारत शेषराव गायकवाड (वय 61) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत संतोष भिसे (वय ४०, रा. तुकारामनगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास खराडी बायपास रस्त्याने निघाले होते. ते चौधरी वस्तीजवळ आल्यानंतर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने गायकवाड यांना जोरात धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघात होताच वाहन चालक तेथून पसार झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक ढवळे हे करत आहेत.