पुण्यातील इंजिनियरची ‘काँग्रेस अध्यक्ष’ होण्याची मनिषा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण याविषयी चर्चेचे गुऱ्हाळ सुरु असतानाच पुण्यातील एका २८ वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरने काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तो सध्या काँग्रेसचा प्राथमिक सदस्यही नाही.

गजानंद होसले हा २८ वर्षाचा तरुण एका फर्ममध्ये काम करतो त्याने सांगितले की, मंगळवारी २३ जुलै रोजी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य होण्याची प्रक्रिया पूर्ण करु. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यावर ते कायम आहेत. नवीन अध्यक्ष कोणाला निवडायचे याबाबत काँग्रेस पक्षात एकी नाही. अध्यक्ष कोण असावा याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आपण आपली उमेदवारी जाहीर करणार आहोत.

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यासाठी त्यांनी चार पानी पत्र लिहिले असून त्यात नवीन अध्यक्षपदासाठी लवकरात लवकर निवडणुक व्हावी, या निवडणुकीत मी कोठेही नसेल. मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता मी पार्टी अध्यक्ष नाही. सीडब्ल्युसीने लवकरात लवकर बैठक बोलावून निर्णय घेतला पाहिजे. असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. राहुल गांधी यांनी राजीनामा देऊन ५० दिवस होऊन गेल्यानंतरही अद्याप काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –