पुणे : पॉकेट मनीसाठी चोरी करणाऱ्या इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे ग्रामीण परिसरातील मंचर येथील इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची टोळी पॉकेट मनीसाठी बंद घरामध्ये चोरी करत होती.  मौज मस्ती करण्यासाठी आणि पॉकेट मनीसाठी ही विद्यार्थ्यांची टोळी हे गुन्हे कर होती. मंचर पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये काही विद्यार्थ्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या मुलांच्या पालकांची गावात संपत्ती आहे.
[amazon_link asins=’B06Y5FYBKP,B06Y5L25M4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab405fa9-b8ee-11e8-a80c-2f64a6102cc5′]

आशिष बाळासाहेब वाव्हल, शुभम गोरक्षनाथ जाधव, आकाश संजय खेडकर, ऋषिकेश गोविंद भोर असे अटक करण्यात आलेल्या इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी वाघमारे व नाईकडे यांना एका वाहन चोराची माहिती मिळाली होती. पोलिसांनी शुभम जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने कॉलेजमधील काही विद्यार्थी पॉकेट मनीसाठी चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
[amazon_link asins=’B00NFJGUPW,B073JPC6R3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b17ac40d-b8ee-11e8-b345-31ea1d3ba2ec’]

पोलिसांनी शुभमच्या माहितीनुसार अवसरी खुर्द गावातून अटक केली. यामध्ये इंजिनीयरिंगचे शिक्षण घेत असलेले आशिष बाळासाहेब वाव्हल, आकाश संजय खेडकर, ऋषिकेश गोविंद भोर यांना अटक केली. हे सर्वजण दिवसाढवळ्या घरफोडी, वाहन चोरी करत होते. पोलिसांनकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून रेसिंग कार, फस्ट ट्रैक कंपनीची घड्याळे, एलईडी टीव्ही, प्रिंटर, दुचाकी जप्त केली आहे.

चोरी करण्याची पद्धत
या सर्व आरोपींची कॉलेजच्या कॅनटीनमध्ये ओळख झाली. या सर्वांनी बंद हॉस्टेलच्या खिडकीला लावलेली पट्टी चोरली. याची विक्री करुन त्यांना सात हजार रुपये मिळाले होते. यानंतर त्यांना चोरी करण्याची सवय जडली आणि हळूहळू ते मोठी चोरी करु लागले. या टोळक्याने मौजमजेसाठी एका बंद घरातून रेसिंग कारदेखील चोरली होती. चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालाची विक्री करुन मिळणाऱ्या पैशांतून मौजमजा करायची हाच त्यांचा उद्योग बनला होता.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B01DF29XFW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbcb258a-b8ee-11e8-ba7a-2fa39e44d91c’]

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपअधिक्षक गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अनिल वाघमारे, नवनाथ नाईकडे व प्रशांत भुजबळ यांच्या पथकाने केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.