Pune : आर्थिक गुन्हे शाखेची देखील झोन नुसार असणार युनिट : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेची पुर्नरचना केल्यानंतर आता “आर्थिक गुन्हे शाखा” व “वाहतूक शाखेची” देखील पुर्नरचना करण्यात आली असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके या काम पहात असून, आर्थिक गुन्हे शाखेची देखील युनिट असणार आहेत. ते झोननुसार हे युनिट असतील, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, आर्थिक गुन्ह्यांचा तपास कसा व कोणी करायचा याची नियमावली तयार करण्यात येत आहे. 3 कोटीच्या पुढील फसवणुकीचे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. पूर्वी ५० लाखांच्या पुढील गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला येत. या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबतच वाहतूक शाखेची देखील पुर्नरचना केली जात आहे. आता झोन ऐवजी रस्ते व मेट्रो मार्गानुसार ही

पुर्नरचना असणार आहे. पोलिस ठाणे व वाहतूक शाखा यांचे काम वेगळे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अधिकारी…

शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात आता प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी कागदावर आल्या असून त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कामाला सुरूवात केली आहे.

आणखी 1400 सीसीटीव्ही..

शहरात सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करण्यात येत असून, आणखी सीसीटीव्ही बसविण्यास परवानगी मिळाली आहे. शहरात नव्याने 1406 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. हे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता शहरावर 2400 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

राज्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदा १२३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पिंपरी चिंचवड आयुक्तालय स्वतंत्र झाल्यानंतर पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतल साधारण एक हजार कॅमेरे होते. पण, हे सीसीटीव्ही कॅमेर कमी पडत असल्याने आणखी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार आणखी 1406 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी रोखण्यासाठी त्याची मदत होणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.