Pune : भाजीपाला, अन्नधान्य, दूध, वृत्तपत्र व्यवसायासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ! रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृह, जीम, क्रिडा संकुले, स्विमिंग टँक बंद; हॉटेलमधील पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू पण संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍यांना 1000 रुपये दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शनिवारपासून (दि.३) शहरात एक आठवड्यासाठी संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी तर सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेदरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांना एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

जिल्हाप्रशासनाच्या आदेशानुसार शहरात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेने आज संध्याकाळी आदेश निर्गमित केले आहेत.

१. संचारबंदी आणि जमावबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्यास व पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

२. भाजीपाला, अन्नधान्य, दूध, वृत्तपत्र व्यवसाय या सारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहाणार. शिफ्टमध्ये चालणारे कारखाने सुरू राहाणार.

३. रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृह, जीम, क्रिडा संकुले, स्विमिंग टँक बंद राहाणार.

४. हॉटेलमधील पार्सल सेवा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.

५. सर्व प्रकारची दुकाने संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहाणार.

६. लग्न समारंभासाठी फक्त ५० आणि अंत्यविधीसाठी २० लोकांना उपस्थित राहाता येणार.

७. सर्व धार्मिकस्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंद राहाणार.

८. सर्व आठवडे बाजार बंद राहाणार. फक्त मंडया सुरू ठेवता येणार.

९. पीएमपी सेवा (अत्यावश्यक वगळता) बंद राहाणार.

१०. युपीएससी आणि एमपीएससीचे कोचिंग क्लास वगळता सर्व शिकवण्या बंद राहाणार.