टेम्पोच्या व दुचाकीच्या अपघातात वाघोलीतील माजी सैनिकाचा मृत्यू

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली-केसनंद रोडवर काळे ओढा परिसरामध्ये टेम्पो आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत वाघोलीतील माजी सैनिक नवनाथ तुकाराम वाडेकर (वय, ४४) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. त्याचप्रमाणे पुणे-नगर महामार्गावर पानमळा परिसरामध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील कमल राजकुमार जोशी (वय, ३०, रा. सिद्धी पार्क सोसायटी, वाघोली) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडली.

वाघोली परिसरामध्ये दोन दिवसात झालेल्या दोन गंभीर अपघातात वाघोलीत वास्तव्यास असणाऱ्या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काळे ओढ्यातील अपघात प्रकरणी पोलिसांनी टेम्पो जप्त केला असून चालक देविदास बबन दिघे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पानमळा येथील अपघातप्रकरणी अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

You might also like