पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन 28 लाख 40 हजार रुपयांची खंडणी (Pune Extortion Case) उकळल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलीचा मित्र असून त्याने 2017 ते 10 फेब्रुवारी दरम्यान मुलीच्या वडिलांकडून खंडणी उकळली आहे.
याबाबत तपन जयसुखलाल दोषी (वय-52 रा. आदिनाथ बंगला, चामोर्शी, जि. गडचिरोली) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन संदिप सिंग उर्फ लकी सिंग (रा. गणेश नगर, लेन नं. 14, बोपखेल) याच्यावर आयपीसी 376, 387, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बालगंधर्व समोर व शहरातील इतर ठिकाणी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी बालगंधर्व समोरील इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेते.
आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत संपर्क साधून तिच्यासोबत मैत्री केली.
यानंतर मुलीला तुझी व कुटुंबियांची बदनामी करण्याची धमकी दिली.
तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीकडे वारंवार पैशांची मागणी केली.
बदनामीच्या भीतीने व जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्य़ादी यांनी आरोपीला 28 लाख 40 हजार 400 रुपये
त्याने सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यावर पाठवले.
आरोपीने पैसे खंडणी स्वरुपात स्वीकारुन आणखी दहा लाख रुपयांची खंडणी मागणी केली.
फिर्यादी यांनी याबाबत खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार अर्ज केला होता.
या अर्जाची चौकशी करुन आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Maratha Reservation | मराठा आरक्षणावर आज महत्वाचा निर्णय, विशेष अधिवेशनात विधेयक मांडणार
ACB Trap Case | सहायक फौजदार लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक