Pune : बारामती तालुक्यात टोळक्याकडून कुटुंबाला बेदम मारहाण, 8 जणांवर FIR

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे 8 जणांच्या टोळक्याने नऊ जणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले असून टोळक्याने कोयता, दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 एप्रिल रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हा दाखल केला आहे.

प्रविण वामन थोरात, अमोल वामन थोरात, हर्षवर्धन किसन थोरात, सुधीर सुभाष थोरात, सुभाष बबन थोरात, सागर भिमराव थोरात, संगिता भिमराव थोरात, वामन बबन थोरात (सर्व रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन दादासाहेब थोरात (वय-38 रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांनी बारामती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात भादवी 326, 143, 147, 148, 149, 188, 269, 270 साथीचे रोग अधिनियम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन थोरात घटनेच्या दिवशी ते घरामध्ये इन्व्हटर जोडत असताना आरोपींनी घरात येऊन त्यांच्या पत्नीला ढकलून दिले. पत्नीला उठवत असताना प्रविण थोरात याने पाठिमागून पकडले. तर हर्षवर्धन याने कोत्याने हाताच्या कोपऱ्यावर वार केला. तर प्रविण याने लोखंडी धारदार हत्याराने डोक्यात वार केले. भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादी यांचे भाऊ यशवंत थोरात यांना देखील आरोपींनी बेदम मारहाण केली. शिवाय त्यांचे आई, वडील, पत्नी, मुले, चुलती यांनाही लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली. या घटनेत जखमी झालेल्यांवर बारामती येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढील तपास बारामती पोलीस करत आहेत.

READ ALSO

Pandharpur By Election Result : भाजपचे समाधान अवताडेंची मुसंडी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर

पंढरपूर पोटनिवडणूक : ट्रेंड बदलला ! भाजपच्या समाधान आवताडेंनी घेतली मोठी आघाडी

IMP NEWS – Gold Price Today : आठवडाभरात 3400 रुपयांनी स्वस्त झाले सोने, जाणून घ्या पुढे आणखी स्वस्त होईल की, येईल तेजी…?