Pune : ‘कोरोना’ झाल्यावरून कुटुंबाला सोसायटीमधील व्यक्तीनी जातीवाचक शिवीगाळ करत केली मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना झाल्यावरून एका कुटुंबाला सोसायटीमधील व्यक्तीनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी भागात ही घटना 29 सप्टेंबरला घडली आहे.

याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बळीराम मोरे, त्यांची पत्नी, मुलगा, सचिन शिंदे, गणेश खोपकर, उमेश खोपकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकील आहेत. ते भैरवनगर येथील एका सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान सोसायटीच्या चेअरमनने सॅनीटायझ करण्यासाठी गाडी आणली होती. यावेळी त्यांनी प्रथम फिर्यादी यांना उद्देशून जातीवाचक बोलत त्यांच्या घरावर फवारणी करा, असे म्हणले. यावरून वाद सुरू झाला. त्यावेळी फिर्यादी घरी नव्हते. त्यांनी तुझ्या कुटुंबाला कोरोना झाला आहे का, असे म्हणत तूझ्या घरातील मरतीलच पण तुझ्यामुळे आम्हाला का मारतो असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी हे अपंग असताना त्यांना ढकलून देत त्यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार 29 सप्टेंबर रोजी घडला आहे. पण फिर्यादी यांच्या घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यामुळे ते बरे झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असल्याचे सांगितले.

You might also like