Pune : ‘या’ कारणामुळं मी आत्महत्येचा विचार बदललला’ ! प्रसिध्द उद्योजक गौतम पाषाणकरांनी सांगितलं 33 दिवसांच्या कार्यकाळात नेमकं काय-काय झालं (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   प्रसिध्द उद्योगपती गौतम पाषाणकर यांचा मंगळवारी तब्बल 32 दिवसानंतर पुणे पोलिसांनी अखेर शोध लावला. त्यांना बुधवारी पुण्यात आण्यात आले. बेपत्ता होण्यामागे कारणांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी एक पत्रकार परिषदेस घेतली. त्यात त्यांनी हजेरी लावली. यावेळी गौतम पाषाणकर यांनी मागील 32 दिवसांच्या प्रवासाचा उलगडा केला. त्यांनी कुटूंबाचा विचार मनात आल्याने आत्महत्येच्या विचारापासून मतपरिवर्तन झाल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेस गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर व इतर उपस्थित होते. गौतम पाषाणकर यांनी 21 ऑक्‍टोबर रोजी सुसाईट नोट चालकाकडे देऊन घर सोडले होते. यानंतर पोलिसांची तब्बल सहा पथके त्यांच्या मागावर होती.
https://www.facebook.com/groups/1277524692599085/permalink/1349544548730432/
दरम्यान त्यांच्या मुलाने एका राजकीय व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. यामुळे पाषाणकर बेपत्ता झाल्याच्या घटनेला वेगळे वळण लागले होते. मात्र तपास करताना पोलिस पाषाणकर यांचे अपहरण झाले नसून ते सुरक्षीत असल्याचे ठामपणे सांगत होते. दरम्यान पाषाणकर यांचे कोल्हापूर येथील एका हॉटेलाच्या सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने तसेच त्यांनी क्रेडीट व डेबीट कार्डचा वापर केला नसल्याने तांत्रीक तपास थांबला होता. मंगळवारी मात्र पाषाणकर जयपूरला असल्याचे तांत्रीक तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानूसार थेट विमानाने पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांचे पथक पाठवून त्यांना पुण्यात आणण्यात आले.

पाषाणकरांनी एकंदर प्रवासाबद्दल सांगताना मागील काही महिण्यात व्यवसायातील उलाढाल थांबली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक कोंडी झाली होती. ती सुधरवण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र त्यातून बाहेर पडून न शकल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. स्वारगेट येथे रिक्षाने आल्यावर बसने थेट कोल्हापूर गाठले. गाठीशी 80 हजाराची रोकड होती. कोल्हापूरवरुन कोईम्बतूर, बंगलोर, तिरुपती बालाजी, कन्याकुमारी, जैसलमेर असा प्रवास करत थेट जयपूरला पोहचलो. आज(बुधवारी) जयपुर शहर सोडून निघणार होता. मात्र पोलिसांनी आदल्याच दिवशी मला गाठले. या कालावधीत कुटूंबाशी कोणताही संपर्क केला नाही. पण जेव्हा किरकोळ रकमेसाठी एका देणेकरी मनाला लागेल असे बोलतो, तेव्हा ते खुपच वाईट वाटते. ही सलच मनाला लागल्याने घर सोडले होते.

You might also like